निंदकाचे घर असावे शेजार

एप्रिल महिन्यात माझे काका श्री. दीपक बसवंत ह्यांच्या घरी सॅन फ्रान्सिस्को येथे जाण्याचा योग आला. काकांच्या घरी जायला मी नेहमीच उत्सुक आणि आनंदी असते. परदेशात राहताना कुटुंबियांना भेटण्याची ओढ नेहमीच असते मग ते भारतात असो वा भरता बाहेर.

काका,काकू आणि काकांची गोड मुलगी सौम्या असं काकांच छोटसं त्रिकोणी कुटुंब. भेटल्यावर सहाजिकच भरपूर मनमोकळ्या गप्पा झाल्या नंतर जेवण. जेवण झायल्यावर मी अशीच खिडकीबाहेर पहात उभी होते. मन हळुहळु आठवणींच्या हिंदोळ्यावर विराजमान झालं आणि मी पहिल्यावेळी विमानतळावर गेले होते तो प्रसंग डोळ्यासमोर तरळू लागला.

मी ७-८ वर्षांची होते. काकांना रिसिव्ह करण्यासाठी मी आणि माझे बाबा आम्ही दोघे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल विमानतळावर दाखल झालो. विमानतळावर जाण्याची माझी पहिलीच वेळ म्हणून मी ही उत्सुक होते. ते विमानतळ मला इतकं सुंदर भासत होतं जणू मी कुठल्या जादुई दुनियेत आले आहे. पण आता ओढ होती ती काकांना भेटण्याची. समोरून बरेच लोक येत होते आणि त्या माणसांच्या गर्दीत माझी नजर काकांना शोधत होती. शोधता शोधता माझी नजर निळे कपडे परिधान केलेल्या मुलींकडे गेली. त्या खूप सुंदर दिसत होत्या. सुंदर बोलके डोळे, गोरे गाल त्यावर हलकी लाली, रेशमी केस त्यांचा बांधलेला अंबाडा. स्वर्गातल्या अप्सराच जणू. मुरडत, चालत एकमेकींकडे पाहून गोड स्मितहास्य करत माझ्या समोरून निघून गेल्या. मी त्यांना पाहण्यात एवढी दंग झाले की काका-काकू आले हे माझ्या गावीच नव्हतं. मी बाबांना कुतूहलाने विचारलं “कोण आहेत ह्या मुली?” “एअर होस्टेस… ह्या विमानात काम करतात, दूर देशी जातात, निरनिराळ्या देशांत शॉपिंग करतात आणि मोठमोठ्या फिल्मस्टार्स ना भेटतात.” असं म्हणत बाबा पुढ गेल आणि मी बाबांच्या मागे. पण त्या मुलींचा माझ्यावर प्रचंड प्रभाव पडला आणि मी मनाशी गाठ बांधली होणार तर मी ‘एअर होस्टेस’ च.

मी लहानपणी च ठरवलं की मला काय बनायचं आहे. मी माझं क्षेत्र निवडलं. त्या क्षेत्राच्या वाटचालीवर मला असंख्य अडचणींना सामोरं जावं लागलं. लोकांची निंदा नालसती ऐकली. त्याशिवाय लोकांची पोटदुखी कशी थांबणार बरं? पण माझी आई नेहमी म्हणते निंदकाचे घर असावे शेजार आशा एक ना अनेक अडचणींवर मात करत मी यशाचं शिखर गाठलं.

आज मला पाहून अनेक मुलींच्या आणि मुलांच्या गालावर तेच हसू आणि तोच स्पार्क मला दिसतो जो छोट्या आकांक्षाच्या डोळ्यांत होता. ते पाहून मला माझ्या यशाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आणि ते वाटत राहील. आज अनेक मुलं-मुली ह्या क्षेत्रात आपली असंख्य स्वप्नं उराशी कवटाळून येऊ पाहतायत. काहींनी त्याची सुरुवातही केली असेल. अश्या माझ्या मित्रमैत्रिणींना मार्गदर्शन हवं असल्यास मी नक्की मार्गदर्शन करेन. तुमचे प्रश्न आणि प्रतिक्रिया यांची वाट बघतेच आहे. आता निरोप घेते. काळजी घ्या… आनंदी राहा… खूप सारं प्रेम

तुमची, आकांक्षा

Advertisements

मातृ – पितृ पूर्णब्रह्म!!

2016-08-11 12.01.36
AAI BABA IN BANGKOK

बालकांच्या स्वप्नांना थारा नसतो हे माहिती होते. पणअसे का मलाही कधी कळले नाही. माझ्या स्वप्नांना काही मर्यादा नव्हती . आई बाबांना कष्ट करताना पाहून मनात असंख्य विचार यायचे. पण हे विचार आई बाबांच्या समोर मांडले, परंतु मला कधी समजून घेतलेच नाही ? हसून मी काढलेला विषय बदलायचे. मी त्यांना नेहमीच म्हणायचीआपण छान घरात राहू, आपण दुर देशी फिरायला जाऊ, विमनातून फिरू…आणि बरेच काही. पण कुणास ठाऊक मी लहान असताना आई बाबांना आपल्या साठी कष्ट करताना पाहून जे मनाला येईन ते बोलायची मला हे सगळ खरं करता येईल का ? कुणास ठाउक पण हे स्वप्न तर मी पाहिलं. पण हे स्वप्न साकार कसे होतील?

आज समाजात वावरत असताना ताठ मानेने प्रामाणिक पणे कष्ट करून त्यांच्या साठी त्या पाहिलेल्या स्वप्नांचा पाठलाग करायचा आहे. त्यांना सुखाच्या पाळण्यात झोपवून त्यांच्या सुखमय आनंदी चेहऱ्यावर हास्य पहावयाचे आहे.त्यांच्या साठी कष्ट करून माझ्या व आई बाबांच्या स्वप्नांना आकार द्यायचा आहे. पण परमेश्वर सुध्दा छान परीक्षा घेत असतो.त्याच्या कृपेने आई बाबांच्या काही इच्छा पूर्ण करताही आल्या. पण त्यांच्या सोबत आयुष्यातला काही वेळ मला काही काढता येत नाही. मातृ – पितृ पूर्णब्रह्म!! हा श्लोक अगदी मनाशी जडला आहे. आई बाबांना सर्व सुख: द्यायचं हे मनापासून ठरवलंय.

11802062_1217132408312878_1221929843_n

आणि म्हणूनच त्यांना मी सर्वप्रथम मुंबई दर्शनास घेऊन गेले. त्यांना मी हेलिकॉप्टर ने मुंबई दर्शन घडवून आणले. खरंच!!! बाबांनी आमच्या सर्व प्रकारच्या गाड्या चालवल्यात, अगदी दुचाकी सायकल पासून ट्रक पर्यंत …..परंतु त्यांना एक गोष्ट नेहमी आठवली की त्यांच्या मनाला फार त्रास होतो ती गोष्ट म्हणजेच त्यांना विमान किंवा हेलिकॉप्टर चालवता आले नाही… आणि म्हणूनच मि त्यांना हेलिकॉप्टर ची सहल घडवून आणली.

आई-बाबा दोघेही हेलिकॉप्टर च्या सफरीमुळे हरखून गेले. बाबा तर इतके खुश होते, त्यांच्या डोळ्यांतला तो निखळ आनंद मी डोळ्यांत साठवला आणि त्यांच्या डोळ्यांत त्यांचं स्वप्नं काही अंशी पूर्ण करण्याचं समाधान मला मिळालं. आज कोणाच्या नशिबी आई बाबांचे आनंदाश्रू पाहायला मिळतात? पण परमेश्वर नेहमी सोबत असतो , त्या परमेश्वराच्या कृपेने मला हि संधी मिळाली. बाप्पा तुझे खूप खूप आभार. मी आज आई बाबांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करते आहे. आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या निस्वार्थी आई- बाबांना अजून काय हवं असत ?

2016-08-15 05.34.16
AAI ON AN INDIGO PLANE

माझे नेहमीच असे प्रयत्न राहतील. जर तुम्हाला पण आपल्या आई- बाबांसाठीअसेच काही करायचे असेल तर, तुमच्या स्वप्नांना कष्टाचे बळ द्या. आई वडिलांना फक्त पैसे खुश ठेवत नाही, तर आपल्या सहवासाने, गोड बोलण्याने , चांगले वागण्याने , त्यांनी आपल्यासाठी घेतलेल्या कष्टाची जान ठेवल्याने , आणि त्यांचा आनंद जपल्याने, त्यांना आनंदी ठेवल्याने तुम्ही सुध्दा यशाच्या शिखरावर जाऊ शकता…….. तुमच्या आई – बाबांच्या स्वप्नांनासाठी ,आणि तुमच्या प्रयत्नांसाठी मनापासून ऑल द बेस्ट!!
पुन्हा भेटू यशाच्या शिखरावर ….

तुमची, आकांक्षा

 

HANOI ( पॅरिशियन स्टाइल ग्रेस आणि एशियन पॅसे)

IMAG4696

आश्चर्यचकित करणारे आणि पूर्णपणे आकर्षक,व्हिएतनाम हे भव्य रंगांचा एक मेळा आहे, भव्य आर्किटेक्चर आणि गंभीरपणे युद्धाची साईट प्रदर्शित करत. उत्तर व्हिएतनाम चे निसर्ग आशीर्वादित आहे, डेल्टा मध्ये तांदळाचे शेत इकडे तिकडे व अगदी हिरव्या मोतीसारखे चमकणारी हिरवळ, नाजूक नक्षीदार व्हिएतनाम ची कंभर अगदी जशी एखादी सुंदर स्त्री, मोहक वालुकामय किनारे असलेल्या करवळीस किनारपट्टी तुमचे मन जिंकुनजाईल.

IMAG4676

ओरिएंटरच्या जुन्या जुन्या डेम, हनोई कदाचित सर्वात आकर्षक, वातावरणातील आणि आशियातील विदेशी राजधानी आहे. हॅनाइ हे शहर अगदी दुचाकीवरच, जीवनाची गति जशी निर्दय आणि ऊर्जा,आणि एंटरप्राइज जसे उल्लेखनीय – खरंच, हे हनोई सर्वात आव्हानात्मक, महत्वाकांक्षी नागरिक सर्व गमावलेल्या वेळेची भरपाई करण्यासाठी निर्धारित आहेत हे दिसते.

IMAG4668
मोटारसायकल्सची सतत लाट भरणे, जवळ जवळ १००० वर्षांपर्यंत व्यापार एक तळहाताची धूळ आणि अद्याप या पुनरुत्थान शहराची नाडी तपासण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण असे हे ठिकाण. हे भव्य विरोधाभास असलेले शहर आहे. लेनिन पार्कमध्ये कम्युनिस्ट पार्टीचे युवक सैनिकी सतत रक्षा करत चालतात आणि लाल ध्वज उंचावर असो ह्याची खात्री करतात. एक दोन रस्ते सोडून, हा मार्ग हॅनाइ च्या युवांमध्ये restraurant साठी खूप प्रसिद्ध आहे, येथे युवकांसाठी ibiza style house music सतत चालू असते. जीवन येथे रस्त्यावर चालते, जरका फेरीवाल्यांना त्यांच्या वस्तूंचे पुरवठा करत फिरावे लागते, तर स्थानिक लोक येथे ड्रीप -कॉफी आणि ‘बीआ होई’ (जगातली सर्वात स्वार्त बिअर) पितात.

IMAG4703

व्हिएतनाम ची अलग मजा, इथली दुचाकी दुनिया आणि इथले वाढते ट्राफिक. वाढते ट्राफिक तर आजकाल ह्या जागेचा गळाघोट घेत आहे असे दिसते. युवा wrong direction मध्ये गाडी चालवत, तर बायका लहान मूल हाथात घेऊन बाईक चालवत.
हनोई राजधानी घोषित करण्यात आले होते १९४५ च्या ऑगस्ट क्रांतीनंतर व्हिएतनामने, परंतु १९५४ च्या जिनेव्हा मान्यतांनुसार व्हिएटमिन्ह हे १९४६ मध्ये फ्रान्सीद्वारे शहर चालविन्यात आले होते. अमेरिकन युद्ध दरम्यान, अमेरिकन बॉम्बफेक मुळे हनोईचे बरेच भाग नष्ट झाले आणि शेकडो नागरिक ठार झाले. हल्ली ची गोष्ट आहे, US च्या हल्ल्या नंतर व्हिएतनाम बरेच सावरले, आज हा देश स्वावलंबी आणि अभिमानानं उभा आहे.

IMAG4758
ONE PILLAR PAGODA

BACHMA TEMPLE
सर्वात जुने मंदिर, ओल्ड quarters च्या मधोमध स्थापित आहे, लै थाई ह्या सज्जनांनी ११०० साली बांधलेले हे मंदिरं त्यांच्या पांढऱ्या घोड्याला मान देत, कारण असे म्हणतात कि त्या घोड्याने ह्या राज्याला हॅनाइ चा रास्ता दाखवला आणि त्यांना इथवर होईन च्या लोकांची मदत करण्यास आणले, व्हिएतनामी लोकांमध्ये फार प्रसिद्ध आहे.

IMAG4685

MEMORIAL HOUSE

एलिगंट हौसे, एका सज्जनांचे घर होते एका काळी, आज हे एक नॅशल संग्रालय आहे, सुमारे १९२५-१९३२ च्या दरम्यान बांधकाम झाले. फ्रेंच आर्किटेक्चर ERNEST HEBRARD हे पहिले सज्जन ज्यांनी त्यांच्या फ्रेंच कलाकारी मध्ये चिनी डेझीन्स टाकल्या.

2016-07-01 16.00.10

HOA LO PRISON MUSEUM
अक्षरशः डोळ्यात पाणी येईल पण त्याशिवाय काय तुम्ही बाहेर पडत नाहीत, अमेरिकेच्या युद्धाच्या वेळी अमेरिकेच्या कैद्यांची (पीओएएस) हत्याकांडांमुळे हनोई हिल्टन या नावाने ओळखल्या गेलेल्या होआ लो तुरुंगात या चिंतेच्या जागेवरच हेच उमटलेले ठिकाण आहे. अमेरिकन पायलटवर लक्ष केंद्रित करून दाखविले आहे जे युद्धाच्या दरम्यान HOA LO मध्ये बंदिस्त झाले होते. विशाल तुरुंगाच्या कॉम्प्लेक्सची निर्मिती फ्रेंच लोकांमुळे १८९६ मध्ये करण्यात अली. मूळतः ४५० कैद्यांना तुरुंगात ठेवण्यात आले होते, १९३० पर्यंत ते २००० कैदी होते. जरासा विचार करा, जिथे ४५० लोकांची जागा तिथे २००० कैदी कसे ठेवण्यात आले असतील? हा जेल काय अगदी यशस्वी न्हवता, करत १००-२०० लोक सहज भिंत ओलांडून पार जात, पण आज राहिलेली लोक काय त्रास सहन करत होती ते ह्या संग्रालयात दाखविले आहे.

2016-07-01 19.31.36

HOAN KIEM LAKE
असे म्हणतात कि १५व्या शतकात ली थाई नामक सम्राट स्वर्गातून एक जादुई तलवार घेऊन पाठवण्यात आले होते, ते ह्या तलवारीचा उपयोग चिनी लोकांना व्हिएतनाम मधून दूर करण्यास वापरात. युद्धा नंतर एक खूप मठ कासव ह्या नदीतून बाहेर आला आणि त्यांनी हि जादुई तलवार स्वतः बरोबर कोळ पाण्यात घेऊन गेला. दररोज सकाळी ६ वाजता नदी च्या किनारे येथे एका प्रकारची पुजा केली जाते.

IMAG4648

हॅनाइ बद्दल बोलू तेवढे कमीच वाटते. इथल्या व्यंजन पासून मनोरंजन पर्यंत, सर्व अगदी मोहक आहे.  नॅशनल थिएटर मध्ये मी एक बाहुलीचा खेळ पहिला, त्यात व्हिएतनाम ची कथा थोडक्यात समजावली आहे, इथल्या पाण्यातल्या बाहुल्या तुमचा मन नक्की जिंकतील ह्याची मला खात्री आहे. पुढच्या सहली साठी आपण परत लवकरच भेटू, तोच पर्यंत मी निरोप घेते.

IMAG4818

तुमची आकांक्षा!!

 

पंढरीनाथ माझे गोड़ नाव!

WhatsApp Image 2017-07-04 at 5.39.46 PMविठ्ठल विठ्ठल जय हारी विठ्ठल, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठू माउली तू माउली जगाची, अशी हि तीन चार भजन माझे अगदी आवडी ची. मी मावस भावाचा शर्ट आणि माझी छोटी मोठी पॅन्ट घालून एकदा आजी च्या घरच्या मोठ्याशा देव्हाऱ्या पुढे विठ्ठल विठ्ठल म्हणत नाचत होती तेव्हा माझ्या बाबांनी मला नाचताना पहिले आणि हसू लागले. माझं नवीन नाव ठेवलं आणि त्या पुढे मला पंढरीनाथ असेच बोलावू लागले. मला घराच्या कुठल्या हि कोपऱ्यातून आकांक्षा नावाने हाक मारली तर मी उत्तरच नाही दिले, पण तेच जर मला पंढरीनाथ बोलावले तर मी भूर कण बाबांकढे पोचायची.

आज आषाढी एकादशी, आणि मला हा माझ्या बालपणाचा किस्सा आठवला. आठवतंय मला कि मी कसं आमच्या शेजार ची बंगाली आजी, मी माजी म्हणायचे तिला, तिचा विठ्ठला वर खूप विश्वास, ती दर आषाढी एकादशी ला पंढपूरला जायची. मी तिला घरात बसून केबल चॅनेल वर तासंतास शोधायची. विठ्ठलाची ओढ मला लहानपणापासून. आमच्या मंदिरात रोज संध्याकाळी मंडळी भजन करत आणि मी त्यांच्या मध्ये लुडबुड लुडबुड.

WhatsApp Image 2017-07-04 at 6.30.14 PM
बालपणी ची मी माउली सोबत

आषाढ शुद्ध एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते, या दिवसा पासुन भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर निद्रा घेतात म्हणून ही “शयनी’ एकादशी असे समजले जाते. या दिवशी चातुर्मास प्रारंभ होतो, तो कार्तिकातील प्रबोधिनी एकादशीपर्यंत चातुर्मास समजला जातो. हे चार महिने विष्णु निद्रा घेतात असे मानले जाते.या दिवशी पंढरपूरला मोठी यात्रा भरते. महाराष्ट्राचे कानाकोपर्यातून विविध संतांचे पालख्यासह लाखो वारकरी विठ्ठल दर्शना साठी येथे जमतात. गावागावातील विठ्ठल मंदिरामधून भाविकांची गर्दी उसळते. भजन, कीर्तन ,प्रवचन या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. लोक या दिवशी उपवास धरतात.

‘लै भारी’ चित्रपटात माउली माउली ह्या गाण्यात खूप छान असे आजच्या दिवसाचे चित्रण केले आहे. जेव्हा जेव्हा मी हे गाणं ऐकते किव्हा भागते, माझ्या डोळ्यात आठवणीं मुळे पाणी आणि अंगावर शहारे उभे राहतात. आमच्या घरा समोर म्हणजेच मंदिराच्या दारात हे सर्व प्रकार होत. आजही आमचा मंदिर मस्त नवीन नवरी सारख सजल असेल.
काश कि मी ह्या सणाला माझ्या आई बाबांसोबत असती, काश कि मला देखील नऊवारी नेसून मंदिरात तुळस घेऊन जात आले असते. माउली कडे हीच निम्र विनंती आहे कि सर्वांचे दुःख, दारिद्र्य, जगातून अशांती, पाप बुद्धी दूर कर आणि सर्वांना सुखः, शांती, आरोग्य दे.

बोला पुंडलिक वर्दे हारी विठ्ठल.. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय

WhatsApp Image 2017-07-04 at 5.45.05 PM
भेटी लागे जिवा.. लागलीसे आस

HOI AN /होई आन: अविस्मरणीय

नमस्कार मंडळी,

मी आले आहे परत तुमच्यासाठी जगातील अभूतपूर्व गोष्टी घेऊन.
माझ्या कामानिमित्त मला जगाची सफर घडत गेली पण त्यातून मला वेगळेपण अनुभवायला मिळालं. तिथली संस्कृती,इतिहास मनावर छाप पाडून गेली. व्हिएतनाम चा इतिहास खूप रोमहर्षक आणि त्याचबरोबर अतिशय दुःखद अनुभवांनी भरलेला आहे. उत्तर आणि दक्षिण व्हिएतनामच्या युद्धात बऱ्याच लोकांना आपला जीव गमवावा लागला, बरेच लोक आपल्या कुटुंबा पासून दुरावले पण व्हिएतनाम थांबले नाही. ते पडले,उठले,लढले आणि ते जिंकले. ह्या सर्व तडजोडी आणि अहिंसेत एक शहर असही होतं जे ह्या सर्व नकारात्मकतेतून उभारून आपली संस्कृती जपत राहिलं. याची साक्ष रस्ते तुम्हाला देतील कारण आजही ते तुम्हाला इतिहासात घेऊन जातील.

होई आन हे व्हिएतनामचे प्रसन्न आणि मनमोहक नगर. नदीच्या काठावर वसलेलं हे सुंदर शहर तुम्हा सर्वांना स्वतःची भुरळ पडल्या शिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे ट्राफिक चा शाप आजही ह्या नगरला लागलेला नाही. हो! मी खरं बोलतेय. इथे बरेच रस्ते दिवसभर मोटारिंसाठी बंद असतात. त्या काळात लोक पायी किंवा सायकलने प्रवास करतात. त्यामुळे प्रदूषणाचा विळखा अद्याप तरी ह्या शहराला पडला नाही आंही ह्या शहराचं वेगळेपण आजतागायत टिकून आहे.IMAG4233

एकेकाळी जपानी लोकांनी काबीज केलेलं हे शहर आजही आपल्याला जपानी संस्कृती, वस्तू यांचं दर्शन घडवतात. त्याकाळात केलेलं बांधकाम त्याची काळजी घेऊन आजही जोपासलं गेलंय. हे शहर नदीच्या काठावर वसल्यामुळे पावसाळ्यात मात्र थोडी गैरसोय होते. (ऑक्टोबर ते नोव्हेंबर) इथे पाणी साचून अगदी गुडघ्यापर्यंत येतं. या नगराची अजून काही खासियत आहे चला ती पाहूया.

Hoi an ol town UNESCO world heritage site कडून ओल्ड टाऊन मधल्या इमारती पाहण्यासाठी पर्यटकांकडून शुल्क आकारण्यात येतं. हे पैसे इमारती जोपासण्यासाठी वापरले जातात. ह्या शुल्कामध्ये तुम्हाला कोणत्याही पाच इमारती/संग्रहालय/रंगायतन इत्यादी पहाण्यासाठी प्रवेश मिळतो. त्याचबरोबर तुम्ही इथल्या पारंपारिक नाटक आणि नृत्याचा आनंदही घेऊ शकता.

IMAG4344
Japanese covered bridge
हे सुंदर छोटे पूल हियोन साज प्रसिद्ध चिन्ह आहेत. जपानी लोकांनी १५९० च्या काळात हे पूल चिनी Quaters शी जोडण्याकरिता बांधले होते. भूकंपाच्या भीतीने बांधलेले हे पूल फारच मजबूत आहेत बरं का! शतकानुशतके हे पूल जपानी कलाकुसरीवर आणि बांधकामावर अवलंबून आहेत. आजही ह्या पुलांवरील कलाकुसर आणि बारीक नक्षीकाम तसंच जपण्यात आलं आहे.IMAG4263

Assembly hall of the fujian chinese congregation
हे मूळ पारंपरिक विधानसभागृह पण कालांतराने त्याचं रूपांतर देवळात केलं गेलं.
उजवीकडील भिंतीवर देवी ‘थीएन हुआ’ चं चित्र दर्शविलं आहे आणि तिच्या दिशेने कंदिल प्रकाशित केले आहेत, कारण ती संस्थापक जहाजाचा बचाव करण्यासाठी वादळी समुद्र ओलांडून गेली होती. त्याच समोरच्या भिंतीवर सहा ‘फुजियन’ कुटुंबाच्या कुटुंब प्रमुखाचं चित्र लावण्यात आलं आहे. जे चीन मध्ये पळून जाऊन होई आन मध्ये १७ व्या शतकात स्थाईक झाले. आतमध्ये शिरताच मोठे टेबल आणि सहा दगडी खुर्च्या आहेत.IMAG4272

Tan ky house
दोन शतकांपूर्वी एक व्हिएतनामी कुटुंबाने हे घर बांधलं. विशेष म्हणजे हे घर त्यांच्या सात पिढ्यांनी गडू निष्ठेने जपलं. बांधकामाच्या शैलीवर जपानी आणि चिनी चिन्हांची झलक पहायला मिळते. जपानी घरांमध्ये कमाल मर्यादा (बसण्याच्या जागेतील) समाविष्ट आहे. ज्याला उत्तरोत्तर कमी आकाराच्या तीन तुकड्यात बांधले आहे. एका वर एक आशा पद्धतीने छपरावर खेकड्याच्या कवचाचा कल्पकतेने वापर केला आहे. त्यावर उत्कृष्ट कोरीवकाम केलं आहे आणि रेशमी पट्ट्यांत गुंडाळलेले आहे. छप्पर असलेल्या काही स्तंभांमध्ये मोथेरे ऑफ पर्ल्स मध्ये चिनी कविता कोरल्या आहेत. इथे अंगणाचा विविध प्रकारे कल्पकतेने उपयोग केला आहे. आत येण्यासाठी, घरगुती स्वरूप दिसण्यासाठी,पावसाचं पाणी साठवण्यासाठी आणि निचरा करण्यासाठी. अंगणाच्या सभोवताली असलेल्या कोरीव लाकडी बाल्कनीला द्राक्षांच्या पानांनी सुशोभित केलं आहे. छापराच्या बाहेरील आकार टाइल्स पासून बनवण्यात आला आहे. तर आतमध्ये लाकडी छप्पर बनवण्यात आलंय. त्यामुळे उन्हाळ्यात घर थंड राहतं तर हिवाळ्यात गरम.

IMAG4243

Quando cong temple
१६५३ मध्ये स्थापित हे लहान मंदिर एक प्रतिष्ठित चिनी जनरल जे निष्ठा, सचोटी आणि न्याय यांचे प्रतीक म्हणून ते पुजले जाते. जेव्हा तुम्ही इथे भेट देता (म्हणजे आपल्याकडे आपण नवस फेडतो तसं)तेव्हा इथला राखणदार एका पितळेच्या वडग्यात मोठी लाकडी पळी फिरवतो आणि त्या मुळे एक विशिष्ट प्रकारचा ध्वनी निर्माण होतो त्या आवाजामुळे सर्वांना कळतं की एखाद्या व्यक्तीने देवाला भेट अर्पण केली.

ईथल्या घरांच्या छपरांवर खेकड्याच्या आकाराचे रेन स्पॉट बांधले आहेत ते नक्की पहा. ते कार्प चिनी पौराणिक धर्माचं प्रतीक आहे आणि होई आन मध्ये लोकप्रिय आहे.
असं हे छोटसं शहर आपल्या खांद्यावर पौराणिक,ऐतिहासिक धुरा सांभाळत स्वतःच वेगळेपण आजही टिकवून आहे आणि पुढेही टिकवून ठेवेल अशी मला खात्री आहे.
होई आन च्या अभूतपूर्व आठवणी मनात साठवत तुमचा निरोप घेतेय. भेटू पुढच्या नव्या शहरात. स्वतःची काळजी घ्या.
तुमचीच आकांक्षा…

THE STORY OF ‘CU CHI’ एक कहाणी -‘कु ची’

व्हिएतनाम देशातील होचिमीन वरून साधारण 30 किलोमीटर उत्तरेला ‘कुची’ हे गाव लागतं. गाव म्हणजे हा जिल्ह्याच. पण आज मी तुम्हाला ह्या जिल्ह्यातील इतिहासाची ओळख करून देणार आहे. कुची नाव जरी छोटसं, गोंडस वाटत असलं तरी त्याचा इतिहास मात्र वेगळा आणि रोमहर्षक आहे. चला तर मग कुची सफरीला.
     हा इतिहास आहे ‘कुची टनल’ चा. उत्तर व्हिएतनाम विरुद्ध दक्षिण व्हिएतनाम असं युद्ध सुरू झालं. दक्षिण व्हिएतनाम ला अमेरिकेचा पाठिंबा होता त्यामुळे त्यांचे पारडे जड होते. अशा परीस्थित उत्तर व्हिएतनामी जनतेला स्वतःचा बचाव करण्यासाठी ठोस बंदोबस्त करणे गरजेचे होते. त्यासाठी त्यांनी २ मीटर, ४ मीटर, ६ मीटर असं करत करत पूर्णपणे भूमिगत मार्ग खोदले. हे मार्ग संपूर्ण गावभरच नाही तर गाव बाहेर ही विस्तारले. जवळपास २१५ किलोमीटर एवढा भुयारी मार्ग त्यांनी स्वतः खणून तयार केला.
IMAG4216
आता ह्या मार्गांचे स्वरूप म्हणजे आपल्या इथली ड्रेनेज लाईन म्हणजेच गटारे. पण त्याहून ही चिंचोळी त्याची रचना. मुळात उत्तर व्हिएतनामी लोकं बारीक चणीची त्याचाच फायदा घेत त्यांनी त्याप्रमाणेच त्याची रचना केली. तो मार्ग वरून बंद करण्यासाठी लाकडी फळी चा उपयोग केला जात असे. असे एकूण ह्या भुयारी मार्गांचे स्वरूप. पण आतमध्ये फक्त अंधाराचे साम्राज्य आणि आतमध्ये ते मशाल अथवा तत्सम काहीच नेऊ शकत नव्हते. ह्या भुयारी मार्गात जाताना उडी मारून आत जावे लागे पण आतमध्ये उडी मारून तसेच वाकावे लागत आणि तसेच वाकून पूर्ण भुयारी मार्गात वावरावे लागे. जर एखाद्या परक्या व्यक्तीने ह्या ठिकाणी प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर ती व्यक्ती एका जाळ्यात अडकली जात आणि त्या व्यक्तीला आपल्या प्राणाला मुकावे लागत. कधी काटेरी लोखंडी साल्या, तर कधी विषारी साप. सरळ रास्ता तर दिसतो पण आत पाय पडला तर ते एक जाळ, माणूस टोकेरी लोखंडी साल्यांमध्ये पडत आणि साल्यांवर विष असे पसरवले कि जर कोणाला साल्यांचं टोक लागला तर व्यक्ती तिथेच ठार. ह्या मार्गांचा कुणाला सुगावा लागू नये म्हणून प्रवेशासाठी लावलेल्या लाकडी फळीवर झाडांची वाळलेली पाने पसरण्यात येत त्यामुळे शत्रूला संशय येत नसे. IMAG4196
     नक्की उत्तर व्हिएतनामी कुठे लपून बसले आहेत हे शोधण्यासाठी दक्षिण व्हिएतनामिनीं श्वान पथकांची मदत घेतली. पण उत्तर व्हिएतनामींनी त्यावर ही तोडगा काढला त्यांनी प्रवेशा साठीच्या लाकडी फळीवर भरपूर मसाला पसरवून ठेवला त्यामुळे जरी श्वान पथक तिथपर्यंत पोचले तरी त्यांना शिंका येत आणि ते श्वान बेजार होत. आशा रीतीने आलेले श्वान आणि दक्षिण व्हिएतनामी निराश होऊन परतत. अशाप्रकारे बराच काळ  उत्तर व्हिएतनामींना भूमिगत व्यथित करावा लागला. त्यादरम्यान त्यांनी त्या भूमिगत मार्गांचे पर्यवसन छोट्या शहरातच केले. राहण्यासाठी घरं, झोपण्यासाठी बेड रूम त्यातच छोटे पलंग तसेच कोणी आजारी असल्यास त्यांच्यावर औषधोपचार करण्यासाठी इस्पितळ, जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघर बनवले. cu-chi-2_0
स्वयंपाकघर तर बनवलेच पण ते ही नामी युक्तीने. चूल पेटायची पण त्यातून निघणारा धूर मात्र थेट २-३ किलोमीटर लांब जाऊन बाहेर पडायचा.तो धूर नेमका कुठून येतो हे शत्रूला ही कळत नसे. त्या धुराचा मागोवा ही घेता येत नसे कारण अतिशय निमुळत्या पाईप द्वारे तो धूर बाहेर सोडण्यात येई. फार डोके लढवून त्या काळी टेक्नॉलॉजि नसताना सुद्धा अशाप्रकारे नीट आणि शिस्तबद्ध भूमिगत शहर रचना करण्यात आली.
 युद्ध संपले पण आठवणी मात्र तशाच आहेत. ह्याच आठवणी कुची सरकारने पर्यटकांसाठी खुल्या केल्या आहेत. मी तिथे गेले तेव्हा त्यांनी मला कुची टनल विषयी माहिती दिली, इतिहास सांगितला. तो भुयारी मार्ग कुठून कुठपर्यंत जातो ते दाखवले. मला स्वतःला ते सारे भूमिगत विश्व अनुभवायला दिले. अजून एक भुयारी मार्ग होता जिथे मी आतमध्ये उतरून पूर्ण १०० मीटर चालत गेले आणि दुसऱ्या ठिकाणाहून वरून बाहेर आले.
download
हे भूमिगत विश्व कुची सरकारने खुलं करण्यामागे मूळ कारण म्हणजे उत्तर व्हिएतनामी त्यात कसे वावरत, मोठमोठे शस्त्र आणि बंदुका घेऊन आतमध्ये कसे शिरत, त्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, सहन केलेला त्रास आणि एक अफाट मानवी विचारशक्ती हे सारे पर्यटकांनी अनुभवावे.
या भूमीवर मानवाने खुप प्रगती केली. अगदी उंचच्या उंच टॉवर्स बांधण्या पासून ते परग्रहावर जाण्यापर्यंत. पण भूमिगत संपूर्ण एक शहर वसवणारे उत्तर कुची वासिय काही निराळेच! मी ते भूमिगत शहर त्यातील संपूर्ण रचना बघून थक्क झाले. तुम्ही ही नक्की एकदा कुची टनल ला अवश्य भेट द्या आणि त्या भूमिगत विश्वाचा गूढ अनुभव घ्यायला विसरू नका.
आता आपली भेट पुढच्या शहरात. तुमच्या साठी घेऊन येत आहे एक ऐतिहासिक व्हिएतनाम मधले शहर जे आजही आपल्याला भूत काळात घेऊनजाईल, ‘होई आन'(HOI AN).
तोच पर्यंत काळजी घ्या आणि माझे मराठी ब्लॉग वाचा आणि मला मात्र नक्की कळवा कि तुम्हाला हे वाचून कसे वाटले.
निरोप घेते तुमचीच आकांक्षा.

हो ची मिन्ह सिटी (व्हिएतनाम) २० वर्षाच्या संघर्षा नंतर .

‘हो ची मिन्ह’ हे सामान्यपणे ‘सायगोन’ ह्या नावाने ओळखले जाते. दक्षिण व्हिएतनाम चे सर्वात प्रसिद्ध शहर, आणि व्हिएतनाम युद्धात सर्वात महत्वाची भूमिका निभावली. हे युद्ध दक्षिण विरुद्ध उत्तर ह्यांचे होते. किमान १नोव्हेम्बर १९५५ साली हे युद्ध सुरु झाले आणि ३० एप्रिल १९७५ रोजी त्यांना स्वतंत्रीय मिळाले. १९वर्ष आणि १८० दिवसांचा हा संघर्षा खूप काटे रुपी होता. पण त्यांनी ह्यातून यश मिळवले आणि आज इथे जो कोणी येत त्यांचे मनःपूर्वक स्वागत केले जाते.
‘हो ची मिन्ह’ हि व्हिएतनाम ची धावती राजधानी असे म्हणीन. आणि हे इथल्या लाखो दोन चाकांबद्दलच नाही तर खरंच हे मी ह्या शहराच्या अगदी इथल्या रंगीन वातावरणावरून बोलत आहे. इथला जोश, ह्या लोकांचा स्वभाव, ह्यांची आपुलकी,आणि बाहेरील लोकांचं खऱ्या मानाने स्वीकार कारण, इथली सुंदरता आहे.
IMAG4102
SAIGON ON WHEELS
भले तुम्हाला फ्रेंच काळातले हॉटेलचा अनुभव घायचा असो किव्हा स्वस्तातल्या स्वस्त जागी राहायचे असो, रस्त्यावरच्या स्वादिष्ट मेजवानी पासून सायगोन ची स्वस्त Binh Tay Market शॉपिंग, इथे कसलीच कमी नाही.
2016-06-27 10.01.16-2
REUNIFICATION PALACE
 माझ्या मागे ‘रेऊनीफिकेशन पॅलेस’ आहे. (Reunification Palace)
रॉयल खजुरीची झाडांनी वेढा घातलेल्या १९६६ साली बांधलेले दक्षिण व्हिएतनाम चे ‘राष्ट्रपतिपदाच्या पॅलेस'(Presidential Palace) आज ‘रियूनिफिकेशन पॅलेस'(Reunification Palace) असे जाणले जाते. १९६० च्या काळातले हे सर्वात उत्कृष्ट बांधकाम असावे, अगदी हवेशीर आणि आतून अंगण असलेले हे बांधकाम सूर्यकिरणांचा पुरेपूर उपयोग करून घेत आहे. ३० एप्रिल १९७५ च्या सकाळी सायगोन येथील राष्ट्रपतिपदाच्या पॅलेस मध्ये पहिले कम्युनिस्ट टॅंक (North Vietnam Communist Party), पॅलेस च्या अंगणात भिंती तोडून घुसले, सायगोन ने उत्तर व्हिएतनाम ला सरेंडर केले. तेव्हा पासून हि इमारत आजही अशीच ना काही बदल करता सांभाळली गेली आहे. येथे फ्रेंच आणि इंग्लिश बोलणारे मार्गदर्शक (Guide) उपलबध असतील.
IMAG4157
WAR REMNANT MUSEUM

‘वॉर रेमनांत संग्रालय’ (War Remnant Museum)
चिनी आणि अमेरिकन crimes चे मुसीयूम असे म्हंटले जाते. जगाच्या पश्चिम भागात बराचश्या पर्यटनां (Travellers) मध्ये प्रसिद्ध आहे. येथे व्हिएतनाम आणि अमेरिकन युध्दाच्या वेलीचे चित्र, अमेरिकन शिपाह्यचे अनुभव, दाखवण्यात आले आहे. लोकांनी ह्या संग्रहालया बद्दल बरीच मते मंडळी आहेत. कुणाचं मत काहीही असो पण तुमचं इथे जाऊन इथल्या इतिहासाबद्दल जाणूनघेणं नक्की बनतं.
IMAG4113
FINE ART MUSEUM
‘ललित कला संग्रालय’ (Fine Art Museum)
१९२९ वसाहतयुगातली(Colonial Era) हि पिवळी आणि पांढरी इमारत अगदी ललित कलेने भरलेली आहे. ४थे शतकापासून ची कला ह्या इमारतीत बघायला मिळेल, आश्चर्य न करता मी हे म्हणीन की ह्या प्रदर्शनात बराचश्या गोष्टी युद्धाततून प्रेरणा घेऊन प्रदर्शित केल्या आहेत. माझ्या कडे वेळ कमी असल्या मुले मला पटापट ह्या संग्रालयातून बाहेर पडावे लागले, पण इकडच्या प्रत्येक भिंती वर एक सायगोन ची कथा कला बघायला मिळेल.
h
JADE EMPEROR PAGODA
‘जडे एम्पेरोर पॅगोडा’ (Jade Emperor Pagoda)
सुप्रीम भगवंत ताऊईस्ट(supreme Taoist god) च्या सामनात १९०९ साली बांधलेले हे मंदिर. आत बऱ्याच देवमुर्त्या सजवून त्यांची पूजा केली जाते, ह्या पॅगोडा (Pagoda-देवळात) शिरताच सकारात्मक ऊर्जा जाणवते. हुओंग (Huong) (अगरबत्ती) चा शुद्ध आणि मधुर सुगंध मनातले नकारात्मक विचार अगदी नष्ट करते. मंदिरात शिरताच मन प्रसन्न होते. ह्या देवळाचे बांधकाम आणि लाकडी कोरीव काम बघण्यासारखा आहे बरंका!
IMAG4104
CENTRAL POST OFFICE
‘सेंट्रल पोस्ट ऑफिस’ (Central Post Office)
नोर्ते दाम बॅसिलिआ (Notre Dame Cathedral) म्हणजेच सायगोन चे church च्या समोर चे १८८६-१८९१ मध्ये सर गुस्तावे आयफेल (Gustave Eiffel) ह्यांनी बांधलेले फ्रेंच पद्धती चे हे सेंट्रल डाक घर. भिंतींवरती भव्य ऐतिहासिक दक्षिण व्हिएतनाम, सायगोन चे नकाशे रंगवलेले आहे. जुन्या फ्रेंच, गॉथिक प्रेरित फारश्या, फर्निचर, आंतरिक नक्षीकाम तुम्हाला फ्रेंच वलयात घेऊन जाईल.
व्हिएतनाम वॉर पीपल्स पार्टी च्या हाथी येऊन ३० एप्रिल १९७५ साली नियंत्रणात आले. सर शो चे मिन्ह ह्यांच्या सन्मानास्पद त्यांच्या नेतृत्वा मुले मिळालेल्या स्वातंत्र्य मुले सायगोन हे हो चे मिन्ह असे जाणले जाते. अनौपचारिक व्हिएतनामी लोक आजही ह्या जागेला सायगोन म्हणतात. सायगोन हे शहरी जिल्ह्यांना उल्लेखले जाते.
उरलेल्या वेळीस तुम्ही इकडची स्वादिष्ट मेजवानी ‘फो’ नक्की खाऊन पहा. ‘फो’ एक नुद्ले सूप असे आहे, शाकाहारी पण मिळेल. प्रयोग करून पाहणाऱ्यांना रस्त्या वर चुलीत भाजलेले गोगलगाई नक्की खाऊन बघितली पाहिजे, त्यातला तो रस्सा …. उम्म्म्म्म आह हा हा! अगदी बोट चाटून संपवाल. संध्याकाळी मेन सेंट्रल एरिया जवळ एक ऑपेरा हाऊस आहे, तेथे त्यांचा पारंपरिक कार्यक्रम सादर केलेजातात.
मी येथून जात आहे अजून व्हिएतनाम बद्दल जाणायला. तुमच्या साठी मज्जेतदार गोष्टीत आणि व्हिएतनामी लोकांची क्रांतिकारी तडजोड आणि त्यांचे स्वतान्त्रिया कडचे अनेक योजना, ह्या कश्या पार पडल्या हे बघायला. पुढचा टप्पा, ‘कुची टनेल’ सायगोन विरुद्ध अमेरिका आणि त्यांची यशा कडची रचना आणि अनुभव घ्यायला. तो पर्यंत निरोप घेते.
तुमचीच
आकांक्षा